विषयाची उदाहरणांसहित उत्तम मांडणी. आवडला, पटला.

या संदर्भात मनोगतावरचाच एक अनुभव उदाहरणादाखल सांगावासा वाटतो. मनोगतावरचे एक मराठीप्रेमी आहेत त्यांनी माझे वेबपेज(पानजाळी म्हणू का? ) बघून मराठीत भाषांतर करून देण्याची तयारी दाखवली होती. त्यांच्या हेतूबद्दल काडिचीही शंका नाही पण माझे(उदाहरणादाखल माझे) जाळ्यातले पान जे मूलतः माझ्या व्यवसायाशी निगडीत आहे आणि माझा व्यवसाय मराठी लोकांपुरताच मर्यादित ठेवण्याइतकी मी मराठी दुराभिमानी नाही त्यामुळे ते पान इतर अनेक मराठी लोकांनी बघणे अपेक्षित आहे, आवश्यक आहे तिथे ते मराठीत ठेवणे हे म्हणजे व्यावसायिक आत्महत्या होऊ शकते. तर अर्थातच ते पान मराठीत असणे हे चूक आहे. किंवा ते पान मराठीत असणे हा दुराग्रह आणि अट्टाहास वाटतो.

थोडक्यात कुठे थांबावे कळायला हवे.