'मथळा' आणि 'तळवा' हे प्रतिशब्दही चांगले आहेत. हेडिंगसाठी मथळा हा शब्द वापरात आहे. ['बातमीचा मथळा' किंवा 'मथळ्याची बातमी' ह्या दोन्ही शब्दसमूहांतला 'मथळा'('हेडिंग')] अर्थात एक मराठी शब्द दोन वेगवेगळ्या (पण अर्थात थोडाफार फरक असणाऱ्या) इंग्रजी शब्दांसाठी प्रतिशब्द म्हणून वापरता येईल, असे वाटते.

अवांतर :
एका तज्ज्ञांनी ब्राउज़रसाठी विहारक (इथे सर्फिंगवर जोर दिसतो) हा शब्द सुचवला. अर्थात मला न्याहाळक हा शब्द अधिक आवडलेला आहे. रिमाइंडरसाठी स्मरणक, बारसाठी पट्टिका हे शब्दही त्यांनी सुचविले. सध्या ह्या शब्दांसाठी इतर कुठले प्रतिशब्द अस्तित्वात आहेत, हे मला माहीत नाही. इथे केवळ माहितीसाठी आणि नोंद व्हावी म्हणून दिलेले आहेत.