शक्य आहे. असे संमेलन भारताबाहेर घेतल्याने स्थानिक उगवते साहित्यिक व भारतातले तसेच बाहेरचे प्रकाशक, मुद्रक यांचे सोशल नेटवर्किंग चांगले होईल.
सॅनफ्रांसिस्को इथे होऊ घालणाऱ्या ह्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला प्रकाशकांनी विरोध केला आहे. (वेगळ्या प्रतिसाद ह्या बातम्यांचे सार किंवा त्यांचे दुवे दिले आहेत.) ह्या विरोधामुळे 'स्थानिक' आणि 'उगवते' साहित्यिक आणि प्रकाशक ह्यांचे 'नेटवर्किंग' होण्याची शक्यता कमी होते आहे की काय, असे वाटू लागले आहे. अर्थात उगवत्या साहित्यिकांना पुस्तक छापून आणायचे असल्यास अशा नेटवर्किंगची गरज नसते, पैसे मोजावे लागतात हा भाग वेगळा. उगवत्या किंवा होतकरू साहित्यिकांच्या पुस्तकप्रकाशनाच्या कंडशमनावर किती मराठी प्रकाशकांचे संसार चालतात, हा अभ्यासाचा विषय आहे.