साहित्य संमेलन हे राजकारणाच्या बरोबरीने आमचे आवडते क्षेत्र. आम्ही बहुतेक साऱ्या संमेलनांना (बऱ्याचदा सक्रीय) उपस्थित राहात आलो आहोत, पण अमेरिकेत होणाऱ्या या संमेलनाचा वाद पाहता  आम्ही बहुधा उपस्थित राहणार नाही, पण मराठी माणसाच्या प्रत्येक सांस्कृतिक उपक्रमाला देतो , तशा याही संमेलनाला आमच्या शुभेच्छा.