माफी असावी. मी एक सामान्य मराठी भाषिक महाराष्ट्री आहे. हे 'अखिल भारतीय साहित्य संमेलन' कशासाठी भरले जाते/ भरवले जाते हेच मुळी मला नाही माहिती. छत्तीस वर्षात तो जाणून घेण्याचा प्रयत्न हि केला नाही. माझं ह्या 'अद्न्याने' अजून तरी काहिच अडलं नव्हतं. पण आता या चर्चेत मला सहभागी होताना ते 'अद्न्यान' आडवं येतंय. व म्हणूनच, जर एखादी गोष्ट माहित नसेल तर इतरांना विचारायची असते, यास्तव मला कोणी 'अखिल भारतीय साहित्य संमेलन' म्हणजे काय? त्या मागचा हेतू काय? अशा संमेलनाने समाजाला काय उपयोग होतो? हे समजवून सांगेल का?
आंतरजालावर ह्या विशयाची माहिती मिळते का ते पाहिले होते पण प्रयत्न व्यर्थ गेला.
हे संमेलन साहित्याचं असतं की साहित्यिकांचं असतं?
अजानुकर्ण म्हणतातः
"खरे आहे. महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला साहित्य संमेलनाची गरज नव्हती आणि नाही. मात्र साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक पुस्तके पुनर्प्रकाशित केली जातात. पुस्तकांची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणावर होते त्यामुळे अशा संमेलनांचा नॉमिनल फायदा नाकारता येत नाही. "
म्हणजे फक्त छापील पुस्तकं विकण्यासाठी हि संमेलनं भरवली जातात का? पण सध्याच्या युगात संगणक व आंतरजाल, माहिती व वेगवेगळे साहित्यप्रकार सामान्य जनतेला घरबसल्या पुरवत असताना, वरिल साहित्यीक संमेलन फक्त छापील पुस्तकांच्या लेखक, कवी जनांसाठीच असणार का? छापील पुस्तके दिवसेंदिवस महाग होत असताना व आंतरजालावर कमीत कमी किमतीत पीडीएफ फाईल विकता येण्यातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचा मोकळ्या मार्गाकडे कां बरं दुर्लक्श होतंय.
हे अखिल भारतीय साहित्य संमेलन सॅनफ्रांसिस्कोत होऊ नये म्हणून विरोध करणे योग्य आहे काय?
'विरोध' हा शब्द मला उगीचच 'मलावरोध' ह्या शब्दाशी जवळीक करणारा वाटतो. असो. माझा तरी विरोध अजिबात नाही. जर संमेलनाचा मुख्य उद्देश 'ग्लॅमर डिस्पले' असेल तर ते किती छान! कुठल्याही क्शेत्रातील दिग्गजांजवळ एक ग्लॅमर हे असतेच व संमेलनाच्या माध्यमातून होणारी ग्लॅमरधारींच्या (प्रभावळकरांची) मंदियाळी' हे तर ऐश्वर्याचंच प्रतिक होईल नाही का? मग ऐश्वर्याला विरोध कशासाठी? परदेशात संमेलन भरविण्याने जर संमेलनाला व त्यायोगे साहित्यीकांना, व टीव्हीवर त्या कार्यक्रमाचा आस्वाद घेणार्यांना एक वेगळाच अनुभव मिळणार असेल तर त्याचे स्वागतच आहे. ठाले पाटलांच्या ह्या अशा धाडसी निर्णय घेवून कार्यक्रम तडीस नेण्याच्या उत्साहाला खुप खुप शुभेच्छा!