कोठावळ्यांनी जो अनुभव घेतला त्याच्याशी मी बरीचशी सहमत आहे. मोठ्या मंडळांत काय चालते हे सांगता येत नाही परंतु आमच्याकडील लहान मंडळाचा अनुभव असा की कार्यक्रमांच्या वेळेस जी मराठी पुस्तके विक्रिला ठेवलेली असतात त्यांच्याकडे ढुंकूनही न पाहणारे अधिक, चाळून बघणारे थोडे आणि विकत घेणारे एकाच हाताच्या बोटांवर मोजता यावेत.

मराठी कार्यक्रमांना उपस्थिती लावणारेही पुढील प्रमाणे आणि पुढील कार्यासाठी

यांत मराठीचे प्रेम इ. चवीला लागले तर लागले एखाद्याचे.

माझ्यामते, हल्ली एनआरआय मंडळींसाठी पुस्तके, चित्रपट इ. काढण्याचे जे फ्याड आले आहे त्यातीलच हे एक फ्याड आहे आणि अमेरिका वारीची संधी चालून आली आहे तेही आहेच.