कुशाग्र,

अतिशय सुरेख कथा...

जी कळी कधीच उमलली नाही, तिचा मंद मंद दरवळ तुमच्या या सगळ्या कथेतून मला जाणवत राहिला आणि नंतर एक अबोध, सावळीशी हुरहूर मनभर पसरली... असो.
फार छान कथा.
ही कथा वाचून मला माझ्या कवितेच्या ओळी आठवल्या...
दोन जीव येतात जवळ का, समजत नाही!
भेटीनंतर विरह अटळ का, समजत नाही!

...इथं तर दोन जीव पुरतेपणी जवळ येण्याआधीच त्यांची ताटातूट झाली... आयुष्यातील मजा (आणि सजाही) हीच ती, कुशाग्र!!!

........................

ही कथा तुमच्या लेखी जुनी असेल... आम्ही  (पक्षी ः वाचक) ती प्रथमच वाचली... वाचत आहोत... मग ती आमच्यासाठी नवीनच नाही काय? साहित्यात असे नवे-जुने काही नसते.

आणखीही येऊ द्यात तुमच्या खजिन्यातील रत्ने बाहेर... :)

शुभेच्छा.