हेडर आणि फूटर हे पानाच्या वर आणि खाली जी मोकळी जागा (याला आडवा समास म्हणावे का) असते त्या भागात लिहिले जातात. बहुतांश वेळेस हेडर आणि फूटर हे त्या लेखाच्या/ पुस्तकाच्या प्रत्येक पानावर येतात आणि ते सारखेच असतात. (तसा हा काही नियम नाही, पानानुसार हेडर्स आणि फूटर्स बदललेही जाऊ शकतात. ) जसे पुस्तकात येणारा पृष्ठ क्रमांक हा फूटर असतो. तो प्रत्येक पानानिशी बदलत असला तरी त्याची जागा, ठेवण, फाँट, आकार हे सारखेच असते.

मनोगताचेच पाहिले तर वर दिसणारे मनोगत - आस्वाद विवाद संवाद आणि दैनंदिनलेख । शुद्धलेखन इ. इ. आडव्या ओळीच्या वरील भाग हा हेडर झाला तर पान खाली सरकवल्यावर आडव्या ओळीनंतरचा मराठी माती - मराठी माणसं - मराठी मती.... आणी त्यानंतरचा डिस्क्लेमर हे फूटर झाले. मनोगताच्या प्रत्येक पानावर हे हेडर आणि फूटर जसेच्या तसे दिसतात.

मथळा हा शब्द प्रामुख्याने शीर्षक (टायटल) म्हणून वापरला जातो असे वाटते.