प्रस्तुत संमेलन बे एरिया महाराष्ट्र मंडळ आर्थिक व इतर नियोजनाच्या दृष्टिकोनातून यशस्वीपणे पेलते की नाही किंवा मंडळाचे आजतागायतचे कार्य, मराठीविषयीची तळमळ इ. चर्चेचे मुद्दे नसल्याने संमेलनांचे उधळले जाणे, भांडणे, आतापर्यंतच्या संमेलनांचे यशापयश, बे एरिया महाराष्ट्र मंडळाचे कौतुकास्पद कार्य वगैरेची चर्चा येथे करण्यात अर्थ नाही. मूळ चर्चाविषय आणि या मुद्द्यांची गल्लत होऊन विषयांतर होऊ नये, अशी प्रामाणिक अपेक्षा आहे.

एकदा भरवून पहायला काय हरकत आहे, या मुद्द्याव्यतिरिक्त वर चर्चिले गेलेले रसिकांचा व प्रकाशकांचा सहभाग नि प्रतिसाद, संमेलन भारताबाहेर अमेरिकेत भरवण्यामागचे उद्दिष्ट असे मुद्दे अधिक महत्त्वाचे आहेत, असे वाटते. चू. भू. द्या̱. घ्या.