अमेरिकेत साहित्यप्रेमी असतील परंतु तुलनेने फारच कमी... तसेच तिथे मराठी साहित्याचे वाचक किती असतील? आणि साहित्याचा आभ्यास करणारे नसणारच.

संख्याबळाच्या दृष्टीने पाहता रसिक तुलनेने कमी असतीलही; मात्र जे आहेत, त्यांत मराठी साहित्याचे वाचकच नव्हे, तर अभ्यासकही नक्कीच आहेत, हे सांगू शकतो.असो.

आणि संमेलनाचा मूळ हेतू बाजूला राहील असे वाटते.

संमेलनाचा मूळ हेतू काय हा कळीचा मुद्दा त्यामानाने दुर्लक्षित का, याची खंत वाटते. खर्च इ. बाबी तर आहेतच, पण संमेलनाचा मूळ हेतू काय आणि तो भारताबाहेर संमेलन भरवण्यातून कसा साध्य होणार, यावर समाधानकारक स्पष्टीकरण देता येईल काय?