संख्याबळाच्या दृष्टीने पाहता रसिक तुलनेने कमी असतीलही; मात्र जे आहेत, त्यांत मराठी साहित्याचे वाचकच नव्हे, तर अभ्यासकही नक्कीच आहेत, हे सांगू शकतो. असो.
अमेरिकास्थित एकुण मराठी जनता आणि मराठी साहित्याचे वाचक/ अभ्यासक याचं प्रमाण(रेश्यो) काढलं तर ते पुणे/ मुंबई/ नागपूर ते पार बेळगाव/ धारवाड/ इंदूर/ बडोदा या ठिकाणच्या एकुण मराठी जनता: मराठी साहित्याचे वाचक वा अभ्यासक या प्रमाणापेक्षा काही वेगळे नसेल नाही का?
एका खूप छोट्या संख्येसाठी एका खूप मोठ्या संख्येने असलेल्या गटाला वंचित केलं जातंय याचं वाईट वाटणं साहजिकच आहे. जेव्हा दर्जात्मक/ तुलनात्मक पातळीवर (क्वालिटेटिव्ह याला अजून चपखल शब्द हवा आहे) दोन्ही गटांमध्ये तसा काहीच फरक नाही... प्रगल्भता, साहित्याची आवड, दमदार साहित्य निर्मिती, साहित्याचा अभ्यास या पातळ्यांवर.