पाच रुपड्यांची गोष्ट हा अनुभव फार आवडला. वीस-पंचवीस रुपये कवींकडून घेऊन काव्यस्पर्धा आयोजित करायच्या आणि जमा झालेल्या पैशातूनच पारितोषिके वाटायची, हा अनेक चोल्लर किंवा फडतूस साहित्यिकांचा किंवा अ-साहित्यिकांचा जोडधंदा आहे. त्यापेक्षा ही स्पर्धा बरी होती की. पाच रुपये मिळाले की. सुदैवी आहात! तर पुढे, ह्या चोल्लर साहित्यिकांपैकी (ह्यापैकी काही जण मान्यवरही आहेत) काही कवी आणि साहित्यिकांनी तर विशिष्ट व्यवसायांशी संबंधित कवींना आणि साहित्यिकांना टार्गेट केले आहे. अनेक अभियंत्यांना, विशेषतः सरकारी खात्यात काम करणाऱ्या अभियंत्याना, आणि डॉक्टरांना हे लोक त्यांच्यातील प्रतिभेची जाणीव करून देतात आणि मग छानछान पुस्तकेही छापून देतात. अर्थात टाळी एका हाताने वाजत नसते. कुछ तुम्हारी अदाएँ क़ातिल थी...कुछ हमें भी ख़राब होना था...जाऊ द्या. त्या xxx कवींचा बाजार पाहिला मी.... 'मधुबंध', 'ऋतुजा' असली काहीशी ह्यांच्या प्रकाशनसंस्थांची नावे असतात बरं....