आमचे एक सर सांगत, "उगाच राजेरजवाड्यांच्या गोष्टी सांगत फिरू नका. ते वेगळे तुम्ही वेगळे. बाजीरावासारखा पराक्रम करावा आणि मग मस्तानी ठेवण्याच्या बाता कराव्या."
थोडक्यात सांगायच तर ते अपवाद होते. सर्वसामान्य उदाहरणे नाहीत. प्रत्येकाच्या मनात तारतम्याचा विवेक असतो. प्रत्येकाला 'चांगले' काय आणि 'वाईट' काय ते कळते. त्या विवेकाला डोळ्यापुढे ठेवूनच संस्कृतीचे लिखित / अलिखित नियम बनत असतात आणि पाळले जातात. परिस्थितीनुसार ते बदलतही जातात. बहुपत्नित्व हे कायद्याने निषिद्ध मानले असले तरी प्रथम पत्नीनेच तक्रार करावी लागते. तरीही बहुतेकजण एकपत्नीव्रत पाळतच असतात. कारण तसे करणे हेच (निरनिराळ्या कारणांनी का होईना) पुष्कळांना योग्य वाटते.
असो.
-श्री. सर. (दोन्ही)