प्रत्येक वेळी संस्कृती रक्षण/संस्कृती भ्रष्ट होत आहे म्हणून तिला विरोध, 'खरी' संस्कृती कोणती, संस्कृतीचा शोध व तत्सम सांस्कृतिक लेख असले की लेखनाचा ९० टक्के भाग हा संभोग, समागम, स्त्रियांचे कपडे व लैंगिक बाबतीतील मोकळेपणा याबाबतींनी व्यापलेला असतो असे माझे आपले एक सामान्य निरीक्षण आहे.
केवळ ह्याच गोष्टी संस्कृतीनिर्देशक किंवा संस्कृतीचे मूल्यमापन करणाऱ्या आहेत का?
येथे कोणताही उपहास नाही पण पोटतिडकीने हा प्रश्न विचारत आहे.
आपला,
(निरीक्षक) आजानुकर्ण