वरील वाक्य दिशाभूल करणारे आहे यात वाद नाही परंतु ही मूळ चर्चा/ लेखही तेवढाच दिशाभूल करणारा आहे हे खेदाने म्हणावे लागेल. काही तथाकथित संस्कृतीरक्षक आपल्या स्वार्थासाठी आपल्याला हवा तो भाग संपादित करून संस्कृतीचे गोडवे गातात. अशांना चर्चांतून विरोध करणे आणि त्याठीकाणी संदर्भ देणे हा एक भाग झाला. दुसरा भाग असा की आपल्याला विषयातील माहिती आहे*, बऱ्या-वाईटाची जाण आहे तरीही एकांगी विचार मांडून विरोधाला-विरोध करणे.
संस्कृती ही फक्त स्त्री-पुरूष संबंधांइतपतच मर्यादित असते असे मला वाटत नाही. कला, स्थापत्त्य, शास्त्र, राहणी, खाणे इ. इ. गोष्टींचा उहापोह सदर लेखात आला असता तर विचार करण्यासारखी गोष्ट होती परंतु लेखाची मर्यादा पाहता केवळ तथाकथित संस्कृती रक्षकांना झोडण्यासाठी लेख लिहिला आहे असे वाटते. त्याला हरकत नाहीच परंतु मग तोच तोच विषय चिवडण्याचे प्रयोजन काय? प्रसंगानुरूप लेख असता तर प्रश्नच नव्हता पण सध्यातरी असा काही प्रसंग घडल्याचे आठवत नाही. (चू. भू. दे. घे.) किंवा त्याचा संदर्भही लेखात येत नाही.
आता गुरू जोसेफ कॅंपबेल काय म्हणतात ते कालच वाचले - एक पुराणकथा सांगताना ते म्हणतात की शिष्याने एखादा प्रश्न करून गुरूला सांगायचे की तू हे शिकवतोस का? तेव्हा गुरू तो विषय त्याला शिकवतो कारण शिष्याला जर विषयात गती आणि रूची नसेल तर ते ज्ञान गुरूने शिकवणे आणि शिष्याने ग्रहण करणे हा वेळेचा अपव्यय आहे असे भारतीय संस्कृती मानते. - भारतीय संस्कृतीतील अनेक चांगल्या गोष्टीही आपण विसरलो आहोत प्रत्यक्षात आणि या लेखात नाही का?
* लेखकाचे अनेक संदर्भ पाहता त्याला विषयातील माहिती आहे असा माझा ग्रह झाला आहे. चू. भू. दे. घे.