प्रियाली,
एक गोष्ट आधीच सांगून टाकतो. मला ह्या विषयातली फारशी माहिती नाहीये. नाहीतर असे प्रश्न मला कदाचित पडले नसते. लिखाणातील संदर्भांचं म्हणता तर बरेचसे संदर्भ राजवाड्यांच्या 'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास' ह्या पुस्तकातून घेतले आहेत. त्यामुळे त्याबाबत माझे काहीच कर्तृत्व नाही. (इथेही चू. भू. दि. घे. )
एक मान्य की मी इथे एकांगी विचार मांडला आहे. त्याचे कारणही मी दिले आहे. ह्या लेखात स्त्रीपुरुष संबंधाबाबतच बरेचसे उल्लेख आले ह्याला कारण म्हणजे ह्याच संदर्भात संस्कृती, संस्कृतिरक्षण आणि तत्सम शब्द वापरले जातात.
आणि लिखाणाचा मूळ हेतू हाच आहे की ह्या व्यतिरिक्त आपण कशाकशाला संस्कृती म्हणू शकतो हे जाणून घेणे.
(अजून एक म्हणजे मी तरी लहानपणापासून संस्कृती म्हणजे पुरातन कालापासून अस्तित्वात असलेल्या चालीरीती, आपल्या पूज्य ग्रंथांमध्ये केले गेलेले उपदेश वगैरे वगैरे आहे असे ऐकत आलोय. लिखाण करताना मलादेखील कळत होतं की कला, स्थापत्य, विज्ञान, राहणीमान, खाणे इ. इ. गोष्टी म्हणजेदेखील संस्कृती म्हणता येऊ शकते. पण त्याबद्दलचे ज्ञान काहीच नाहीये त्यामुळे लिखाणात त्यासंदर्भात काहीही येऊ शकले नाही. )
प्रसंगाचं निमित्त म्हणता तर तेही आधीच लिहिलं होतं. बातम्या देणाऱ्या वाहिन्यांवर आणि वृत्तपत्रांमध्ये बरेच दिवसांत संस्कृती, संस्कृतिरक्षक, संस्कृतिभक्षक आणि तत्सम शब्द पाहायला मिळाले नाहीयेत.
एखादी चर्चा व्हायला आणि प्रश्नांची उत्तरे मागायला कोणत्या तरी प्रसंगाची गरज आहे असे मला तरी वाटत नाही.
तथाकथित संस्कृतिरक्षकांना झोडण्याच्या हेतूचं म्हणता तर ती माझ्या लिखाणाची मर्यादा!
एकुणात लहानपणापासून संस्कार संस्कार म्हणून जे अनुभवलंय ते आणि कदाचित तथाकथित संस्कृतिरक्षकांचा प्रभाव ह्यामुळे संस्कृती म्हणजे आणखी काय हे माहीत करून घेणे हा ह्या लिखाणाचा हेतू आहे.
भारतीय 'संस्कृती'तील कोणत्या चांगल्या गोष्टी आपण विसरलो आहोत हे जाणून घेणे हादेखील लिखाणाचा एक हेतू आहे.

(निरीक्षक) आजानुकर्ण,
आपले निरीक्षण अचूक आहे ह्यात वादच नाही. माझादेखील प्रश्न हाच आहे. संस्कृती संस्कृती म्हणतात ती एवढीच असते काय रे भाऊ? माझी पोटतिडीक इथे दिसली नाही ही माझ्या लेखनाची मर्यादा.

श्री. सर.,
आपल्या बाजीराव-मस्तानीच्या मुद्द्याला अनुसरून हॅम्लेट आणि प्रियाली यांच्या प्रतिसादाशी मी सहमत आहे. मस्तानी ठेवण्याचा आणि शूर असण्याचा एकमेकांशी काहीही संबंध आहे असे मलाही वाटत नाही.

मुशाफ़िर,
खरं सांगायचं तर आपला प्रतिसाद नीटसा कळला नाही. कालप्रवाहानुसार बदलते, तरीही कायम राहते तीच खरी संस्कृती नाहीत. नाही बॉ! नाही कळलं आपल्याला. नक्की काय म्हणायचंय?  कालप्रवाहानुसार बदलते पण कायम राहते तीच खरी संस्कृती आहे? की नाही? आणि कालप्रवाहानुसार बदलते पण कायम राहते म्हणजे नक्की काय? थोडे उदाहरणांसहित स्पष्ट केल्यास बरं होईल.

जाता जाता :- हे लिखाण मी 'चर्चा' ह्या सदरात टाकले होते. मूळ हेतू चर्चा होणे हाच होता. (आणि मूळ प्रश्न 'संस्कृती म्हणजे काय?' हाच होता. ) प्रशासकांनी लिखाणाचे स्वरूप (बहुतेक आकारमान) पाहून ते 'गद्य साहित्य' ह्या सदरात प्रकाशित केले आहे. आपल्याजवळचे ज्ञान पाजळून इतिहासकालीन आणि पुराणकालीन स्त्रीपुरुषसंबंधांबाबतची माहिती मनोगतींना देणे हा हेतू तर बिल्कुलच नव्हता. ह्यापुढे प्रतिसाद देणाऱ्या मनोगतींना नम्र विनंती की संस्कृती म्हणजे नक्की काय काय हे सांगण्याचा प्रयत्न करावा. लेखात चिवडला गेलेला 'विषय' म्हणजेच फक्त संस्कृती असा माझ्या मनात भ्रम नाहीये. किंबहुना केवळ हा 'विषय' म्हणजे संस्कृती नाही तर इतर अनेक गोष्टी संस्कृती म्हणून आपण अभिमानाने सांगू शकतो. पण त्या नक्की कोणकोणत्या हे माहीत व्हावं ही अपेक्षा आहे. नुसत्या लेखावरील प्रतिक्रिया अपेक्षित नाही आहेत. चर्चा होणं अपेक्षित आहे.

प्रशासक,
कृपा करून हा लेख चर्चाविभागात हलवाल काय? माझ्या उद्देशाविषयी प्रतिसादकांच्या मनात शंका दिसते.