आजानुकर्ण ह्यांच्या मताशी मी सहमत आहे. वरील लेख अतीशय अभ्यासानंतर लिहिला गेला आहे ह्यात शंका नाही. माझ्या अल्पज्ञानामुळे मी फार काही लिहू शकत नाही. फक्त एकाच मुद्द्यावर प्रतिक्रिया लिहू शकतो. लग्नानंतरही नियोगपद्धतीने पुत्रप्राप्ती करून घेणाऱ्या कुंती आणि माद्री पूज्य?
माद्रीला पूजले जाते असे माझ्या ऐकिवात नाही. पण कुंती पूज्य आहे ती तिच्या भक्तियोगामुळे. कुंती श्रीकृष्णाची भक्त होती. तिने श्रीकृष्णाकडे जन्मभर दु:खाचा "वर" मागितला होता ज्यायोगे तिला भगवंताचा कधिही विसर पडू नये, अशी कथा आहे. हनुमान, मीराबाई त्यांच्या असामान्य भक्तीमुळे जसे देवपदाला पोहोचले तशीच कुंती असे मला वाटते. चू. भू. द्या. घ्या.