एटिकेट्सचा संस्कृतीशी काय संबंध हे कळले नाही. आपण म्हणतात त्याप्रमाणे 'स्त्रियांनी/पुरुषांनी हे करावे/करू नये' ह्या गोष्टींनी संस्कृती बनत नाही.
लेख बाजीरावापर्यंत थांबलाय असं मला तरी वाटत नाही. लेखाच्या अगदी सुरुवातीला सतीच्या चालीचा उल्लेख आला आहे. 'मासे खाण्या'च्या संस्कृतीचादेखील उल्लेख आहे. ह्या गोष्टी बाजीरावानंतरही अस्तित्वात आहेत असं वाटतं. बाजीरावानंतरच्या पोषाखाबद्दलही थोडं लिहिल्याचं आठवतंय.
ढोबळमानाने 'काय करावे/करू नये'बद्दल बोलत असाल तर ह्या गोष्टी पूर्वापार चालत आल्या आहेत. लेखात ज्या अर्जुन-उर्वशीच्या कथेचा उल्लेख आला आहे त्या कथेतही असेच आहे. उर्वशी सहवासाची मागणी करते आणि अर्जुन ती 'असे करू नये कारण ते योग्य नाही.' असे म्हणून फेटाळतो. (कदाचित ते त्या काळचे एटिकेट्स असावेत.) त्यावर उर्वशी त्याला शाप देते. आपल्याला नक्की कशाबद्दल 'करावे/करू नये' हा प्रश्न म्हणजे एटिकेट्स वाटतात ते एकदा स्पष्ट करावे.