हो खरं आहे हे.
वाटतं एकटं बऱ्याचवेळा. काय कारण असावं? मलाही नाही आवडत फोनवर बोलत बसायला. पण समोरच्या माणसाबद्दल नाही वाटत विश्वास.
रोज अशी माणसं भेटतात, की वाटतं जास्तीत जास्त वेळ आपल्या ओळखीच्या माणसांबरोबर राहावं. ते जमत नाही म्हणून मोबाईल (भ्रमणसंच म्हणण्यास विरोध नाही पण मला मुद्दामून नेहेमीचा शब्द बदलावासा नाही वाटत ) चा वापर.
द्वारकानाथजी (आता मी नेहेमीच सगळ्यांना तूच म्हणतो. वयाच. अंतर मध्ये येऊ नये म्हणून, पण.. ) तूमच्या लिखाणात मला जास्त काळजीचा सूर जाणवला, प्रियाली म्हणते(तूम्ही म्हणू का? ) तसा तक्रारीचा नाही.
स्वतःचे "स्पेस" मिळावी असं तर हमखास वाटतं, पण कधी कधी एकटेपणा लादला गेल्यासारखाही वाटतो (क ओढावून घेतल्यासरखा? ).
पुस्तकं मी वाचतो पण हेही कबूल की त्यात ईंग्रजीच जास्त. पण ती मराठी पुस्तकांहून वरच्या दर्ज्याची आहेत म्हणून नाही (अपवाद तांत्रिक)
तर वेगवेगळ्या देशांमधील लेखकांनी ईंग्रजीमध्ये लेखन केल्या मुळे त्यात विविधता (जास्त) आली आहे.
संमेल्लनामध्ये सहभाग कमी आहे. पण बघा ना "अ. भा. सा. सं. " चं काय होतं आहे. नाही राहत मग त्याचं आकर्षण.
आणि चर्चेत सामील होण्याचा हा छोटासा प्रयत्न.
छान विषय आहे हा, यामार्गे दोन्ही पिढींनी एकमेकांचं म्हणणं काय हे जरी फक्त ऐकून घेतलं तरी बरच साध्य होईल. समजून घेणं आणि पटणं यांची सुरुवात ऐकून घेऊनच होते ना?
मी माझं मत व्यक्त केलं, पण तरूण पिढीचा प्रतिनिधी म्हणून नाही. एक व्यक्तीगत मत. इतरांची मते वेगळी असूही शकतात, असतीलच.
पण आमची पिढी चर्चा करत नसल्यामुळे मला माहित नाही. :)
किंवा असतीलही माझ्यासारखी......
"As you get more and more personal you get more and more general"