सगळे विषय कुठेतरी कोणीतरी चर्चून झालेच आहेत.

"ह्या लेखात स्त्रीपुरुष संबंधाबाबतच बरेचसे उल्लेख आले ह्याला कारण म्हणजे ह्याच संदर्भात संस्कृती, संस्कृतिरक्षण आणि तत्सम शब्द वापरले जातात."

हे पटलं.

कालप्रवाहानुसार बदलते, तरीही कायम राहते तीच खरी संस्कृती.

म्हणजे मला वाटतं की अशी संस्कृती जी बदल आत्मसात करून टिकून राहते किंवा समृद्ध होते.

आणि संस्कृती ही एकसंध गोष्ट नाहीच वाटत.

आता आपली संस्कृती म्हणजे मी भारतीय संस्कृती समजू का? खरच आपला देश एकाच संस्कृतीने जोडला गेला आहे का? नाही असं वाटत.

मग प्रत्येक राज्याची  संस्कृती  वेगळी, त्यात लेखात म्हटल्याप्रमाणे जातीची.. उपजातीची संस्कृती वेगळी.

जर व्यक्तीगत पातळीवर पोहोचू शकलो तर आढळून येईल की प्रत्येक व्यक्तीची संस्कृती वेगळी.

मग खरं संस्कृतीचं रक्षण म्हणजे, प्रत्येक व्यक्तीच्या संस्कृतीला मिळणार अभय.

कोणावरही "ही आपली संस्कृती "  असं लादलं जात नसेल तर खरं आपली (भारताची) संस्कृती समृद्ध आहे, टिकून आहे असं मला वाटेल.

(जे सध्या नाही वाटत)

कोणी संस्कृत पंडितानी संस्कृतीची फोड करून शब्दशः अर्थही सांगावा.