आपल्या तारुण्यात -
अ > आपण जे काही करत असताना लोक आपल्याला नावे ठेवतात -

ब> जे काही आपण करू शकत नाही म्हणून आपण चरफडतो -

आपली मुले तरूण झाल्यावर-
क> ती जे करत असतात त्यातील ज्याला आपण नावे ठेवतो  -

ड> जे काही त्यांनी करू नये असे आपल्याला मनापासून वाटते -

- अशा सर्व गोष्टींना चढवलेला तत्त्वज्ञानाचा पोषाख म्हणजे आपली संस्कृती.

एक चावून चोथा झालेली मध्यमवर्गीय (आणि तरीही मी रवंथ करत आहे अशी) व्याख्या! ;)

ती वाचवायची म्हणजे आपण काय करायचं आहे?
- मुळात ती वाचवायची आहे असं तुम्हाला वाटतं का? वाटत असेल तर 'कशी वाचवायची?' ते आपोआपच कळेल.
नसेल तर प्रश्न निरर्थक.