सगळे प्रतिसाद नाही वाचता आले, त्यामुळे द्विरुक्ती करत असेन तर माफ करा. पण मला वाटते मूळ लेखकाची संस्कृती आणि आचरणपद्धती यात मोठी गल्लत होते आहे. आचरणपद्धती या मुळात संस्कृतीवर आधारलेल्या असतात. त्या देशकालपरिस्थितीनुरुप वेगवेगळ्या असू शकतात. स्वतःच्या आणि इतरांच्या जीवनानुकूल (मराठीत प्रो-लाईफ) वर्तनावर संस्कृतीचा भर असतो