'कालप्रवाहानुसार बदलते, तरीही कायम राहते तीच खरी संस्कृती असा  विशाल दृष्टिकोन आपण ठेवला तर, "संस्कृती म्हणजे काय? आणि ती वाचवायची आहे म्हणजे नक्की काय करायचं आहे? असे प्रश्न पडणार नाहीत.' हे म्हणायचं होत. काही भाग प्रतिक्रियेत वगळला गेल्याने विपर्यास झाला. उदाहरण म्हणजे जाती व्यवस्था हा जर संस्कृतीचा एक चांगला भाग आहे म्हणून तो कायम राहावा, अस जर कोण मानत असेल तर ती संस्कृती खरोखर कायम राहावी काय? हा नक्कीच वादाचा मुद्दा आहे. काळाप्रमाणे योग्य ते बदल करून जर जुन्या चालीरीती कायम राहिल्या तरच त्या स्वागतार्ह आहेत. ज्या गोष्टी त्या काळात योग्य असतात (अथवा समाजाकडून योग्य तशा सुधारल्या जातात) त्याच शाश्वत राहतात. अखेर बदलच शाश्वत आहे.