बहुधा लेखात स्त्रीपुरूष संबंध इतकाच संस्कृतीचा विचार केला आहे कारण तथाकथित संस्कृतीरक्षक फक्त तेवढ्यावरूनच जाळपोळी करतात. (मग फायर वर ब्यान येतो) असो.
आपल्या पूर्वजांनी ज्या गोष्टी सांगितल्या, आचरल्या ती एका प्रकारे संस्कृती म्हणता येईल. रिचर्ड डॉकिन्स यासाठी मेम हा शब्द वापरतात. मेम हे एक कल्चरल युनिट आहे. समजा मी चहा करताना आधी चहा उकळतो, मग दूध घालतो आणि मग त्यात मध घालतो (समजा). ते चांगले लागत असेल तर माझे मित्र-मैत्रिणीही तसेच करायला लागतील. अशा प्रकारे त्या मेमचा प्रवास सुरू होईल. अर्थात अशा सर्वच गोःटी चांगल्या/तर्कशुद्ध असतीलच असे नाही.
आपण जेवताना आधी भात, मग पोळी घेतो हा ही संस्कृतीचा भाग आहे. किंवा आपल्यात पॉलीगॅमी चालत नाही हा ही संस्कृतीचा भाग आहे. सर्व जगातील लोक एकत्र जमले, ते सर्व दिसायला सारखे असले तर त्यांच्या ज्या आचरणामुळे ते भारतीय म्हणून ओळखले जातील ते आचरण म्हणजे भारतीय संस्कृती. (सगळीकडे असे मला वाटते.)
हॅम्लेट