म्हणजे चाली रीती नव्हेत. तुम्ही उल्लेख केलेल्या चालीरीती या त्या त्या काळात समाज मान्य होत्या, त्या काळानुरुप बदलत जाणारच .एका पेक्षा जास्त लग्न करण्यामागे अनेक वेळा राजकीय हेतू असत. उदा. शिवाजी महाराजांच्या ८ राण्या.. किंवा पंडु राजाने माद्री राणीशी केलेला विवाह... अर्जुनाने पण द्रौपदी व सुभद्रा यांच्याशिवाय अनेक राजकुमारींशी विवाह केलेला आहे.
संस्कृती म्हणजे मुल्य जी कधी बदलत नाहीत ...संस्कृती चांगले आणि वाईट यातील फरक सांगते...उदा.
लोकांशी आदराने वागतो तो सुसंस्कृत आणि उद्दामपणे वागतो तो असंस्कृत
प्रामाणिकपणा ही संस्कृती आणि अप्रामाणिकपणा हे असंस्कृत असल्याचे लक्षण...
आणि ही संस्कृती जी वेदकाळात होती, तीच पुराणकाळात होती, इतिहासात होती आणि आज सुधा तीच आहे..तीचं रक्षण करायचे म्हणजे ती समजून घेउन आपल्या आचरणात आणायची...