संस्कृती हे एक प्रचंड मोठे संकुल (कॉम्प्लेक्स) आहे. ह्या संकुलात रोटीबेटीचा व्यवहार, धार्मिक कृत्ये, कामजीवन, खाद्यजीवन, सामाजिक व्यवहार, भाषा, वेशभूषा आदी अनेक गोष्टी येतात. असो. तर आपल्याला ह्यापैकी नक्की कुठल्या संस्कृतीबद्दल चर्चा करायची आहे? समाजशास्त्रीय उत्क्रांतीचा किंवा बदलांचा अभ्यास करण्याच्या हेतूने वि. का. राजवाड्यांनी 'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास' हे पुस्तक लिहायला घेतले होते. एके काळी पाहुण्याला हरप्रकारे 'खुश' करणे हे यजमानाच्या पत्नीचे कर्तव्य होते. पुढे जाऊन हळूहळू ह्या गोष्टी निषिद्ध समजल्या जाऊ लागल्या. उदा. रेणुकेची गोष्ट. सामाजिक चालीरीतींत बदल का, कसे घडत गेले ह्याची कारणे आणि उत्तरे शोधण्याचा थोडाबहुत प्रयत्न राजवाड्यांनी ह्या अपूर्ण पुस्तकात केला आहे. ह्या पुस्तकातल्या काही निवडक उताऱ्यांच्या जोरावर संस्कृतीची चर्चा केल्यास ती तुटुपंजी ठरेल.