आम्हाला शाळेत असे शिकवले होतेः

पीपल हा शब्द एखाद्या देशाचा, राज्याचा किंवा वंशाचा उल्लेख करण्यासाठी वापरतात. उदा. वुई द पीपल. तर लोकांचा समूह अशा अर्थी वापरताना तो पीपल्ज म्हणून वापरतात. पीपल्ज ऑफ साऊथ एशिया.

साधारण तशीच पद्धत हेअर/हेअर्स बाबतही आहे.

मोजता येण्याजोगे अनेक केस असले किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अनेक केस असले (उदा. कुत्रा, मांजर, माणूस यांचे केस) तर तिथे हेअर्स  असे वापरतात. जर मोजता न येण्याजोगा एकाच प्रकारच्या केसांचा समूह (पुंजका) असेल तर तिथे हेअर हाच शब्द अनेकवचनी वापरतात.

आपला,
(स्मरणशील) आजानुकर्ण