अदितीच्या काही मुद्द्यांशी सहमत!
त्यातले कोणते मुद्दे व का सहमत आहे त्याचा उहापोह न करता येथे मी माझा अनुभव लिहीणे जास्त समर्पक ठरेल.

माझ्या मते लेखनाची मांडणी ही शब्दां इतकीच महत्त्वपूर्ण असते. ह्या मांडणीत केलेला बदल (संपादन) चुकीचा असल्यास त्या लेखातल्या शब्दांवरचे वजन (इंपॅक्ट) कमी होते. लेखकाच्या अपेक्षेचे स्वल्पविराम, उद्गारवाचक चिन्हे, तोडलेली वाक्ये ही लेखनाच्या नेमक्या ठिकाणी न उमटल्यास एक सरळसोट निबंध वाचत असल्याची भावना वाचकाची होते.

माझ्या ह्या अनुभवाची 'लिटमस टेस्ट' करायची झाल्यास मनोगतावरील माझे असंख्य लेख व मागच्या दिवाळी अंकातला "दिघूकाका" हा लेख एकमेकांशेजारी ठेवून वाचावा......

संपादक कोण व त्याची अहर्ता काय ह्या भानगडीत नाके न खुपसता असे सुचवावेसे वाटते की कमीत कमी लेखनाच्या मुळ मांडणीला धक्का न पोहचवता संपादन व्हायला हवे.

बाकी संपादकांची जबाबदारी ते जाणतातच व त्यात ते खरे उतरतील ही अपेक्षा!
दिवाळी अंकाला व त्यासाठी मेहनत घेणाऱ्या मंडळींना शुभेच्छा....
दिवाळी अंकासाठी माझी कथा/लेख लवकरच पाठवेन.