झाला असता तर स्पष्टच तसे लिहून वाखाणणी केली असती. माझ्या प्रतिसादाच्या ओघातून स्पष्टच आहे की तोटा झालेला असल्याने मी तसा प्रतिसाद दिला आहे.

कुठल्याही शुभकार्याला अपशकुन करू नये असा प्रघात आहे पण मी लेखनाच्या मांडणी बद्दल जे सुचवले आहे त्याबद्दल अवाक्षर ही न लिहीता चित्तोपंत, आपण नफा तोट्यावर घसरलात ! असो.....

मूळ प्रत नक्कीच संपादकांकडे आहे. संपादक मंडळाने सुचवल्याप्रमाणे मीही मागच्या लेखाची मूळ प्रत सांभाळून  ठेवलीच आहे. चित्त, महाजालावरील लेखना बद्दल कोणी काय निष्कर्ष काढायचे ते ठरवणारा मी कोण ? वाचक वाचतात व प्रतिसाद देतात त्यातून आपण (लेखकाने) निष्कर्ष काढायचे असतात व त्या निष्कर्षां वरून आपल्या लेखनात सुधारणा करायच्या असतात ह्या मताचा मी आहे.

मी एक सुचना केली होती, संपादक मंडळास  मान्य नसल्यास त्यांनी त्याला केराची टोपली दाखवायला हरकत नाही !