प्रिय माधवराव, कोणीही अपशकुन केल्यामुळे काही बिघडणार नाही. ज्यांना करायचे आहेत त्यांना
खुशाल करावेत. ज्यांना मनोतावर असलेल्या आपुलकीपायी, प्रेमापायी काम
करायचे आहे ते दुर्लक्ष करून उत्तम काम करतीलच. ह्यावर्षी अंक १० पट चांगलाच निघेल अशी
अपेक्षा आहे.
सोप्या मराठीत लिहिण्यापायी 'फायदा' आणि 'तोटा' हे दोन शब्द वापरले गेले. शब्दांच्या जंजाळात अडकू नका आणि अडकवूही नका, ही नम्र विनंती.
तुमच्याजवळची मूळ प्रत आणि प्रकाशित लेख ह्यांची तुम्ही तुलना करून फायदा कसा झाला नाही, हे इथे उदाहरणांसहित स्पष्ट केल्यास, त्याची इथे चर्चा केल्यास आणि मूळ मांडणीला पोचलेला धक्का दाखवून दिल्यास फार उत्तम होईल. सगळ्यांनाच शिकायला मिळेल. आणि हे मी अगदी मनापासून म्हणतो आहे. ह्यात कुठलाच अलंकार नाही.