संख्याशास्त्रात पक्षपृथक्करण (डिस्क्रिमिनण्ट ऍनॅलिसिस म्हणजे पक्षपात पृथक्करण/विश्लेषण? ) असे काहीसे तंत्र आहे असे वाटते. त्यात एकेका गटाचे गुणधर्म ठरवून एकेकाला तेते गुणधर्म किती प्रमाणात लागू आहेत त्याची मोजणी करतात. त्या सर्व गुणांचा हिशेब करून एक संख्या काढली जाते. त्या संख्येच्या मूल्यानुसार ती ती व्यक्ती (किंवा गोष्ट) या गटात मोडते की त्या गटात असा पक्षपात/अशी पक्षनिश्चिती करता येतो/ते. चू. भू. द्या. घ्या.
तुम्ही निरनिराळ्या संस्कृतींचे (तुम्हाला पटणारे) गुणधर्म गोळा करावे. एकेका व्यक्तीला विचारून तिच्यात ते कितपत आहेत त्याची मोजदाद करावी. असे केल्याने ती व्यक्ती ह्या संस्कृतीत की त्या हे समजण्याचा मार्ग मिळेल असे वाटते.