"नऊ कोटींच्या महाराष्ट्राची मराठी भाषा जगभर पोचवायची असेल, तर संमेलन परदेशातही भरविण्याची ताकद आपल्याकडे यायला हवी. मराठी माणसांत ती ताकद आहे". - संदीप देवकुळे - अध्यक्ष बे एरिया महाराष्ट्र मंडळ.
ह्या मंडळाची सभासद संख्या दोन हजार. तेव्हा ह्यापुढील पायरी म्हणून त्या पुढले संमेलन दोन सदस्य असलेल्या महाराष्ट्र मंडळाने जगातून कोठूनही पैसा फेकायची तयारी दाखवली, तर तिथे 'घेऊन जावे'. मग ते दक्षिण ध्रुवावर असो नाहीतर पश्चिम ध्रुवावर. तुम्हा कोत्या लोकांना शंकाच फार!! ही अशी संमेलने जगभर गेल्याने मराठीचा प्रचार व प्रसार जगभर होणार आहे, ह्याचा आपणा सर्वांना आनंद व्हायला व्हावा.