गजा हातात वीस किलोचे रिकामे पोते आणि सुतळीचा गुंडा घेऊन हिंडताना मलाही उत्तर सापडले.

गजा प्रथम पोत्यात गहू काढून घेईल. ते सुतळीने बांधेल. पोते वीस किलोचे असल्याने आणि गहू पाच किलो असल्याने त्यात सुमारे दोन तृतीयांश जागा रिकामी राहिल. मग ते पोते उलटे केले (आतली बाजू बाहेर), की पोत्यात गव्हाचे बांधलेले गाठोडे आणि रिकामी जागा असेल. मग गजा त्यात बजाकडचे ओव्हरहाईप्ड तांदूळ काढून घेऊन मग गहू बांधलेली सुतळी सोडून गहू बजाच्या रिकाम्या पोत्यात काढून घेईल. मग तांदूळ थोडे सारखे केले आणि सुतळीने बांधले की झाले गजाचे गाठोडे तयार! तेही फुकट!