हायपोथिसिस म्हणजे काही तर्क मांडून एखादी गोष्ट खरी असू शकेल असे दाखवणे. इथेही ती गोष्ट सिद्ध झालेली नसते परंतु काही तर्क आधारासाठी असतात.
वरील बाबतीत माझे मत थोडे वेगळे आहे. हायपोथिसिस बरोबर किंवा चूक असू शकते पण तर्क काटेकोरच असतात म्हणजे असावेत. तरीही तर्क किंवा युक्तिवाद कितीही काटेकोर आणि बरोबर असला तरी तो चुकीच्या हायपोथिसिसवर आधारित असेल तर काढलेले निष्कर्ष चुकीचे असतात.
माझ्या मते ऍझम्पशन आणि हायपोथिसिस ह्या दोन्हीचा अर्थ एकच आहे. पहिला शब्द त्यामानाने बोलीभाषेतला आहे तर दुसरा शास्त्रीय परिभाषेतील आहे.
हायपोथिसिस चा Oxford Dictionary तील अर्थ- proposition or suppoistion made as the basis for reasoning or investigation
तेव्हा त्या अर्थाने मला गृहीतक हाच शब्द हायपोथिसिस साठी बरोबर वाटतो. [लेट्स टेक धिस ऍज वर्किंग हायपोथिसिस." असे शेरलॉक होम्स वॉटसन ला दोन/तीन वेळा म्हणालेला आहे! (;-))]
मीरा