२० किलोच्या रिकाम्या पोत्याला अर्ध्याहून जरा जास्त पर्यंत उलटे करावे.. ( कपडे धुताना तुमान उलटी करतो तसे..आतला भाग बाहेर आणि बाहेरचा भाग आत)
नंतर पोत्याच्या तोंडाला सुतळीने घट्ट बांधावे. मग पोते उलटे केल्या मुळे तयार झालेल्या भागात बाज्याचे गहू भरावे आणि पोत्याचे तोंड सुतळीने घट्ट बंद करावे. मग प्रथम बांधलेली सुतळी सोडून पोत्याच्या खालच्या भागत बाज्याचे तांदूळ घालावेत आणि पुन्हा सुतळीने बंद करावे. आता दुसऱ्यांदा ( गहू घालून झाल्यावर) बांधलेली सुतळी सोडून बाज्याला त्याचे गहू परत करावेत ..

केशवसुमार.