पुण्यातच फक्त संमेलन घ्यायचा प्रस्ताव ".... कुत्रा आवर" या म्हणीप्रमाणे वाटतो. कारण त्यातून संमेलन फक्त पुणेकरांचाच मक्ता आहे का, असा वाद व्हायचा. मुख्य म्हणजे संमेलनासाठी पैसा पुरवणारे लोक गणपतीच्या वर्गणीप्रमाणे वैतागतील नि फुकट मिळतेय म्हटल्यावर पुण्यातल्या साहित्यिकांच्यात भांडणेही सुरू होतील. त्या भांडणाला वैचारिक वाद म्हणायची वेळ आपल्यावर येईल. ते चुकूनही नको.