५५हे प्रश्न खरेतर नंतरच्या परिस्थितीबद्दल किंवा येथे गैरलागू वाटतील, पण तरीही येथे देत आहे.
१. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवड करणारे किती मतदार भारतातील (निवासी) असतील? कारण महामंडळाच्या घटनेप्रमाणे पूर्वाध्यक्ष, सर्व घटक व संलग्न संस्थांचे पदाधिकारी आणि निमंत्रक संस्थेने सूचविलेले त्यांचे स्थानिक मतदार असे लोक अध्यक्ष निवडतात. यात बहुतेकदा स्थानिक मतदारच अधिक असतात.
2. वरील परिस्थितीत मतदार अमेरिकेतून जास्त असल्यास अध्यक्ष तरी भारतातील (निवासी) असतील का? की तेही अमेरिकेतून सापडतील. पहिली अनिवासी अध्यक्ष होणारी व्यक्ती महाराष्ट्राला किती ज्ञात असेल? मुळात त्या व्यक्तीची साहित्य सेवा किती असेल.? हाच प्रश्न स्वागताध्यक्ष, उद्घाटक इ. संदर्भात आहे.
३. या कार्यक्रमाला येणे बऱ्याच जणांना जमणार नाही. अशा लोकांची सोय किमान दृश्यफीत/ चित्रफीत या आधारे केली जाईल का, की त्यांनीही वाचनालयात (फुकटात )मिळणाऱ्या वृत्तपत्रांमधील बातम्यांवरच जगायचं?
४. निवडल्या जाणाऱ्या सत्तर जणांसाठी कोणते निकष लावले जाणार आहेत? त्यांत नातेवाईक-गोतावळा किती?
५ . सुमारे सत्तर जणांचा खर्च करू शकणारे अमेरिकन रसिक संमेलन स्थळ ठरविण्यासाठी येणाऱ्या पाच सहा जणांच्या समितीचा खर्च पेलू शकले नसते का? मग अशा वेळी संमेलनस्थळाची प्रत्यक्ष भेट न देताच निवड कशी केली गेली?