माझा अनुभव असा आहे की मायक्रोवेव्ह ओव्हन बरोबर मिळणाऱ्या पुस्तकाचा फारसा उपयोग होत नाही.
मात्र 'मायक्रोवेव्ह खासियत' हे उषा पुरोहित यांचे पुस्तक[ रु. १००/-] आणि सुधा कुलकर्णी यांचे 'मायक्रोवेव्हमधील
२५० पदार्थ '[रु. ९०/-] हे पुस्तक खूपच उपयुक्त आहे. शास्त्रीय आणि तांत्रिक माहिती बरोबरच हा ओव्हन कसा,
कशा-कशासठी वापरायचा, भांडी कोणती वापरायाची ही माहिती सुद्धा आहे. आणि पाककृती सुद्धा छान होतात.
हा माझा स्वतःचा अनुभव आहे. प्रयोग करून पहा.