५ . सुमारे सत्तर जणांचा खर्च करू शकणारे अमेरिकन रसिक संमेलन स्थळ ठरविण्यासाठी येणाऱ्या पाच सहा जणांच्या समितीचा खर्च पेलू शकले नसते का? मग अशा वेळी संमेलनस्थळाची प्रत्यक्ष भेट न देताच निवड कशी केली गेली?
अमेरिकेत जेथे संमेलन भरणार तेथील उपस्थितांसाठीच्या सोई जसे बसण्यासाठी खुर्च्या,खाणेपिणे,स्वच्छतागृहे यांबाबत चांगलीच व्यवस्था असेल, असे एक पायाभूत गृहीतक यामागे असावे, असे वाटते.संमेलन सॅन होजे शहरातील सॅन होजे कन्वेन्शन सेंटर येथे १४, १५, १६ फेब्रुवारी २००९ ला भरणार असल्याचे कळते. ही वास्तू उपरोल्लेखित आवश्यक सुविधांनी सुसज्ज अशीच आहे. तिथवर जाण्यासाठी वाहतुकीची सार्वजनिक साधनेही अतिशय कमी(स्वस्त या अर्थी) दरात उपलब्ध आहेत (ही वास्तू,स्थानिक सार्वजनिक वाहतूक यांबद्दलच्या स्वानुभवावरून हे विधान करण्याचे धाडस करीत आहे).त्यामुळे तुमचा वरील मुद्दा तांत्रिकतेच्या दृष्टिकोनातून बरोबर असला, तरीही संमेलनस्थळाची निवड किंवा त्यासाठीची प्रक्रिया सर्वस्वी चुकीची नाही (निवड चुकलेली नाही), हे नक्की.