छायाचित्ररुप वृत्तांत (बापरे - कित्त्ती कळाघात/की स्ट्रोकस खर्ची पडले हे दोन शब्द लिहायला) आवडला. कपडेपट नोंद घेण्या सारखा आहे. नेहेमीच्या वापरातल्या गोष्टी घेऊन केला असावा असे वाटते. तरीही रंगसंगती छान साधली आहे. छायाचित्रे उठावदार आली आहेत. प्रधानजी, राजा, चरणसिंग, सेनापती आणि मारेकरी यांचे कपडे विशेष आवडले. सहभागी मुलांना आणि आयोजकांना नक्कीच खूप आनंद दिला असेल या कार्यक्रमाने असे वाटते.
सर्वांचे मनापासून अभिनंदन.
-प्रभावित