"राजीव, लवकर आवर मला उशीर होतोय. " बायकोची हाक कानावर पडताच प्रोफेसर महोदय सिगरेट चे थोटूक घाईघाईत समोरच्या रक्षापात्रात चिरडत उठले.
"हे काय अजून तू ड्रेस-अप नाही झालास? शॉवर तरी घेतला आहेस ना? की फक्त ड्रायक्लिनींग आजही? " बिना बाहेर येऊन म्हणाली.
"दोन मिनीटांत कपडे चढवत होतोच गं" च्या*** आजही शॉवर रखडला असे मनांतल्या मनात विचार करीतच प्रोफेसर महोदय उठले.
"ममा, आज स्कुल मध्ये काय नेऊ? " लेकाने मध्येच तोंड खुपसले तेव्हा त्याची मम्मा स्वत:च्या तोंडावर रंगरंगोटी करण्यात मग्न होती.
"जा पप्पा कडून ५० ची नोट घे एक" मम्माने सोप्पा उपाय सुचवला. नाहीतरी डबा करणे, भाज्या पोळ्या बनवणे ह्यासाठी आपला जन्मच झालेला नसल्याची जाणीव बिनाला होती.
"अगं ५० रुपड्यांत काय होणार ह्याचे? साधा बर्गर तरी येईल का? " राजीवने आत येत विचारले.
"त्या पेक्षा बाळं तू एकदम एक ५०० ची नोटच घेऊन ठेवत जा आठवड्याभराची. सॅटरडे-संडे हॉलिडे असतो ना तुला? पण हिशेब पक्का ठेवायचा बरं! " ..............
*******************
एक सुचवणीः जोवर आपल्या भागाला दुसऱ्या कोणा मनोगतीचा प्रतिसाद येत नाही तोवर आपण पुढचा भाग टाकू नये नाहीतर अवचितपणे कथेचे मूळ बदलले जाण्यात जी गंमत आहे, ती जाईल.