एक तर जनानखाना ठेवणारे सर्व राजे शूर होते असे नाही.
अगदी बरोबर ! अफजल खान, शास्तेखानाबद्दल माझे मत हेच आहे. हे तर सरदार होते (राजे नव्हे) पण औरंगजेबाचे काय ? स्वतःच्या बापाला व भावांना विष व इतर उपायांनी ठार मारणारा हा शासनकर्ता तरी कुठे शुर होता ?
दुसरे म्हणजे शूरपणा केला की जनानखाना ठेवण्याचे लायसन मिळते असेही नाही.
अनेक हिंदू राजे शुर होते मग त्यांनी केलेली ८-८ लग्ने हा सांस्कृतीक जनानखाना म्हणावा का ?
तिसरे म्हणजे ब्रुस विलीस च्या कन्यारत्नाचे ज्या पोराबरोबर लफडे होते त्या पोराने ब्रुस विलीस च्या बायकोशी (डेमी मुर) शी लग्न केलं म्हणे ? छान सांस्कृतीक घराणी आहेत !
राउ ने मस्तानी वर प्रेम केले म्हणजे तीची आपल्या जनानखान्यात नेमणूक केली का हा प्रश्न ही विचारावासा वाटतो.
जनानखाना, लग्ने, प्रेम व लफडी ह्यांच्या व्याख्या कोणी ठरवाव्यात ?
ब्रुस विलीस च्या घटस्फोटीत बायकोने काय करावे हे व्यक्तिस्वातंत्र्याच्या व्याख्यात मोडते पण बाजीरावाचे मस्तानी वरचे प्रेम अनौरस ठरते ह्याला काय अर्थ आहे ?