राजहंस यांच्या मताशी पूर्णपणे सहमत.. त्यांनी वळूचे चांगले विश्लेषण केले आहे. दिलीप प्रभावळकर हे ब्राह्मण दाखवले आहेत. जर त्यांच्या बाबतीत दाखवलेला विनोद अन्य जातीच्या बाबतीत दाखवला असता तर टिकेची झोड उठली असती. पण ब्राह्मणांना कोणीही टपली मारून जावी वा कोणीही उपदेश करावा अशी स्थिती सध्या आहे.

मला वाटते वळू च्या बाबतीत "मारुतीच्या बेंबीत हात लावल्यास (विंचू चावला तरी) गार वाटते" असा प्रकार झाला आहे. कोणी टिका केलीच तर बाकीचे काय म्हणतील या विचाराने सर्वच त्याचे कौतुक करत आहेत. वळूसारखा मराठी चित्रपट खुद्द मुंबई -महाराष्ट्रात आणि परदेशात चांगला चालत असेल तर आनंदच आहे पण वळू खूप काही खास वाटला नाही हे नमूद करावेसे वाटते.

मल्टीप्लेक्स मध्ये पाहून तर घोर निराशा झाली. कारण पूर्ण वेळ त्या चित्रपटात एक प्रकारची पिवळसर झाक होती. कृष्णधवल चित्रपट पाहतो तशी. तसेच फिल्मही जुनी झाल्यासारखी कमी दर्जाची वाटली.