वळू बद्दल "छान आहे, वेगळा आहे" आणि "छ्या, काहीच नाही त्यात" अशी दोन्ही प्रकारची मते ऐकू येतात. अजून पाहिला नाही, त्यामुळे कॉमेंट करणे शक्य नाही. चांगला वाटणे अथवा न वाटणे हा वैयक्तिक आवडीचा भाग म्हणता येईल, पण राजहंस, आपण आपली मते नेटकेपणाने आणि मुद्देसुदपणे मांडली आहेत हे आवडले. अशीच आपल्याला (आवडलेल्या आणि न आवडलेल्या) चित्रपटांबद्दलची मते/परीक्षण वाचायला आवडतील. पुलेशु.
मंदार मोडक म्हणतात त्याप्रमाणे "मारुतीच्या बेंबीत हात लावल्यास (विंचू चावला तरी) गार वाटते" असा प्रकार झाला असण्याची शक्यता आहे. पण त्याचबरोबर परीक्षणात वळूबद्दल अफाट स्तुती वाचून वाढलेल्या अपेक्षा हेही वळू न आवडण्याचे कारण असू शकेल असे वाटते.