बिनाला ऑफीसला सोडून राजीवने गाडी पुढे दामटवली. प्रो. मेहतांचा कॉल अपेक्षेप्रमाणे कॉलेजला पोहोचण्याच्या आतच आला. आज कॉलेजच्या बोर्डाची नवीन मॅनेजमेंट स्कूल चालू करण्याबाबत बैठक होती. त्यात ऑपरेटींग टीम मध्ये रजिस्ट्रारचे पद मिळाले तर हे रोजचे लेक्चरचे काम बदलणार !!! गाडी कॉलेजच्या पार्कींग मध्ये वळवेस्तर फोन व्हॉईस मेल वर गेलेला.

स्टाफ रूम मधे शिरताच प्रो. इनामदार व प्रो. डिसुझा बाईंचे प्रसन्न स्वागतपुर्ण स्मितहास्य स्विकारत राजीवने टेबलवर ब्रीफकेस ठेवली आणि संगणक सुरू केला.

-----