,बोर्डसाठी मराठीत प्रतिशब्दः फळा, फळी, फळकूट, फलक; पुठ्ठा; पाट, पाटा, पाटी, पट्ट, पट्टी, पट्टिका, पीठ, व्यासपीठ; मंडळ, सदस्यमंडळ; खानावळ इ. इ.
मदरबोर्डचे मातृफलक हे उत्तम भाषांतर आहे. पण प्रतिशब्द हे भाषांतरच हवे असे नाही. प्रतिशब्द शक्यतो असा असावा की ज्याचा अर्थ थोड्या विचारान्ती मूळ इंग्रजी शब्द माहीत नसतानाही समजावा. त्या बाबतीत मातृफलक कमी पडतो.
मला सुचलेला शब्द - मांडणीपाट.
कीबोर्डसाठी कळफलक इतका वाचनात येतो की की कळपटसारखा कळकट (की काळपट? ) शब्द कधी कुणी सुचवला असेल असे वाटत नाही.