संगणकावर अर्धवट राहिलेले एक प्रेझेंटेशन त्याला डिसुझा बाईंच्या मदतीने तयार करायचे होते. डिसुझा समोर असली की प्रो. राजीवचे कुठलेच प्रेझेंटेशन पूर्ण होत नाही हे प्राध्यापक वर्गाला माहित होते. म्हणून ह्या महत्त्वपूर्ण विषयावरच्या सादरीकरणाला उशीर होऊ नये म्हणून प्रा. इनामदारांना निरिक्षक म्हणून मदतीस देण्यात आले होते.
महाविद्यालयातल्या मुलांना कुटूंब पद्धती व आपल्या आई-वडिलांशी नाते व्ऱूद्धींगत ठेवण्याबद्दलचे हे सादरीकरण म्हणजे बाळबोध शिक्षणाचा प्रसार हे राजीवचे आवडते मत होते. त्याने डिपार्टमेंट मध्ये तसे म्हणताच कोलाहलच माजला होता. टिचर्स/प्रो. रुमचे रणांगण व्हायचेच बाकी होते. व्यवस्थापनीय शाळेच्या कार्यकरणी चमूच्या उपकुलपतीची जागा मिळाल्यास ही असली भिकार प्रेझेंटेशन्स द्यावी लागणार नव्हती. हे सगळे आठवताच राजीवला मनोमन हसू आले.

तेव्हढ्यात इनामदारांनी घरून फोन असल्याची बातमी त्याला दिली.
"अरे, मी नुकताच तर घरून निघालो, फोन कोणाचा होता ?" त्याने इनामदारांना विचारले.
"आपल्या वडिलांचा, ते सांगत होते की, मोबाईलवर फोन लागत नाही म्हणून कॉलेजला केला. "
"हो बरोबर नेमका मेहता साहेबांचा फोन त्याच वेळेला आलेला असावा."
प्रो. मेहतांची आठवण होताच त्याने मेहतासाहेबांना फोन फिरवायला सुरुवात केली.
................

अवांतरः मला मजा येतेय. पुढचा भाग कोणता असेल ते खुद्द लेखकाला माहित नाही अशी धमाल कथा येथे तयार होणार असे वाटतेय. जास्तीत जास्त लेखकांनी ह्यात भाग घ्यावा ही विनंती.