वा, लिखाण आवडले. भूमकरांकडे चोरी झाल्याची बातमी तुमच्या अमेरिकेतल्या मुलाला कशी कळाली हे बाकी एक कोडेच राहिले, असो.
द. मा. मिरासदारांची एक गोष्ट आहे. लग्नात वऱ्हाडी मंडळींचा ऐवज संभा नावाचा भुरटा लांबवतो. थोड्या वेळाने तो परत आणून जसाच्या तसा जाग्यावर लावतो आणि थक्क झालेल्या वऱ्हाड्यांना आपण चोरी कशी केली याचे एक प्रात्यक्षिकच दाखवतो. 'पण संभा परत आलाच नाही! ' हा या गोष्टीतला पंच. ती आठवली.