ष्माऐवजी श्मा, षऐवजी श, वूऐवजी ऊ, क्षऐवजी क्श... भाषा (शा असे लिहिणार होतो! ) बदलायला आपण (पक्षी ः तुम्ही) सुरुवात केलेली आहेच.... स्वतःपासून सुरुवात करावी, या उक्तीला जागला आहात तुम्ही. रावलेऐवजी रावलॅ असे लिहून :)
.........
सतीशराव,
मला एक कळत नाही.... जिथे आपण (इथे आपण सारेच... केवळ तुम्हीच नव्हे! ) शुद्धलेखनाची चाड ठेवत नाही, तिथे भाषा बदलण्याच्या गप्पा कशा काय मारायच्या? आधी पाया (शुद्धलेखन) पक्का असायला हवा... मग वरच्या मजल्यांमध्ये कसाही बदल करता येऊ शकतो. करायलाही हवा.... काळानुरूप...! आधी शुद्धलेखन `शुद्ध` लिहायला हवे... त्यानंतर मग व्याकरण!
तु्म्ही तुमच्या या लेखात इंग्रजीचा उल्लेख केलेला आहे. तुम्ही म्हटले आहे की - इंग्रजी भाषेतील व्याकलनामध्ये हे चापल्य आहे, म्हणूनच इंग्रजी शाळांचं प्रमाण वाढतंय. इंग्रजी भाषेच्या व्याकलनामध्ये (आवडला हा नवा शब्द, तुम्ही बनवलेला) चापल्य, लवचिकता जरूर आहे... पण स्पेलिंगच्या बाबतीत तिथे गय केली जात नाही... ज्या शब्दाचं स्पेलिंग जे आहे, त्या शब्दाचं स्पेलिंग तेच लिहावं लागतं... त्या भाषेत स्पेलिंगला असं महत्त्व नसतं, तर अचूक स्पेलिंग सांगण्याच्या स्पर्धा तिथे भरवल्याच गेल्या नसत्या. इंग्रजीत जे स्थान स्पेलिंगचं आहे, तेच मराठीत शुद्धलेखनाचंही...!
तुमच्या संकेतस्थळाची लिंक तुम्ही याच संकेतस्थळावर कोठेतरी दिलेली आढळली. नंतर तुमचे संकेतस्थळ उघडून पाहिले... सुबोध हा शब्द त्यात आहे... मात्र, त्याचे स्पेलिंग Subhod असे केलेले आढळले. त्याचा उच्चार होतो सुभोद.... मला तर काहीच `बोध` झाला नाही... `सु`ची तर गोष्टच दूर! दुवा देताना तुम्ही सुबोध लिपी असेच लिहिलेले आहे... त्यामुळे तुम्हाला सुभोद असे नक्कीच म्हणायचे नसणार... आपली भाषा बदलता बदलता आपण इंग्रजी भाषाही बदलू लागलो आहोत की काय? :)
छोट्या छोट्या गोष्टींत इतकी अनास्था जर आपण (सगळेच हां! ) बाळगत असू, तर भाषा बदलण्यासाठी वेगळी मेहनत करायची गरजच उरणार नाही... ती तिची तीच बदलत राहील...! मात्र, तिच्या या अशा बदलण्याला `प्रवाही` नक्कीच म्हणता येणार नाही...