ह्या चर्चेस धरून इतर १६ चर्चा मराठी शब्दांवर मनोगतावर झाल्याचे जाणवले व मराठी भाषेबाबत प्रत्येक जण किती जागरूक आहे ते बघून अचंबा वाटला.
आपण सर्व बरेच शब्द सुचवतो. इतरांनी सुचवलेले शब्द वाचतो त्यात दुरुस्त्या किंवा सुचवण्या करतो पण हे सर्व केल्यावर बऱ्याचदा एखादा शब्द विसरतो किंवा वेळे / कामा अभावी मनोगतावर येणे न जमल्यास नवे शब्द नजरेआड होतात.
ह्या शब्दांची यादी करावी अशी एक कल्पना मनात येते. रकाने पाडून इंग्रजी शब्द (किंवा मूळ शब्द) एका बाजूला लिहून त्याच्या समोरच्या रकान्यांत प्रतिशब्द असावेत. प्रतिशब्द दुव्याच्या स्वरूपात द्यावेत (हिरव्या रंगातल्या अक्षरांत) त्यावर टिचकी मारल्यास संबंधीत चर्चेचा दुवा उघडेल. अशी यादी तयार असल्यास मराठी शब्द शोधून काढण्यास सोपे जाईल व कुठलीही सोपी गोष्ट पटकन अंगिकारली जाते / वापरात येते.
अशी यादी कोणी तयार करण्यास पुढाकार घेतल्यास / करण्यास सुरुवात केली असल्यास मी मदत करण्यास तयार आहे.